*सोने..." जीवनाचे एक ध्येय "*
मित्रांनो सोने म्हणजे स्त्रीधन किंवा दागिने असेच आजपर्यंत आपण त्याकडे पाहत आलो आहोत, पण गेल्या काही वर्षात सोन्याने जी काही भरारी घेतली आहे, ती पाहता सोने म्हणजे बचतीचा एक सर्वोत्तम मार्ग असे मानले तरी काही वावगे ठरणार नाही.
आता मी आपणापुढे उदहारणा दाखल, आयुष्याचे एक गणित मांडण्याचा प्रयत्न करीत आहे, ते पाहून आपण सुद्धा आश्चर्यचकित व्हाल आणि म्हणाल, "सोने तारी त्याला कोण मारी!" हो ना? चला तर मग आता लक्ष देऊन वाचा.
मी जे गणित मांडत आहे, ते पूर्णपणे इच्छा शक्तीवर आधारित आहे, ते कसे पूर्ण होईल?, नक्की होईल का?, असे कधी होऊ शकते का? असे कोणतेही लॉजिक न लावता या कडे पहावे.
हे एखाद्या मित्राच्या आयुष्याचे उदाहरण घेऊ,
1. मित्राने ठरविलेले त्याचे आयुर्मान = 81 वर्षे.
2. मित्राचे सध्याचे वय = 40 वर्षे.
3. मित्राचे उर्वरित आयुष्य = 41 वर्षे.
4. मित्राचे इच्छित मासिक उत्पन्न = 1 लाख रुपये. ( कुठलीही तडजोड न करता मित्र या उत्पन्नात समाधानी आहे )
5. मित्राचे वार्षिक उत्पन्न = 12 लाख रुपये.
आता ( 12 x 41 वर्षे ) हा आकडा खूप मोठा होतो, जो सहजच मानवी मेंदूला पटत नाही, की एवढे पैसे आपणास उर्वरित आयुष्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी लागणार आहेत. म्हणून तर मी त्यास सोन्याचे बिस्कीट ( 100 ग्रॅम वजनाचे ) या रूपात बदल करत आहे, ते मी सोन्यामध्ये का करत आहे हे आपणास सरतेशेवटी कळेलच.
6. आजचा सोन्याचा ( 100 ग्रॅम बिस्कीटचा ) भाव = 15 लाख रुपये.
7. मित्राचे वार्षिक टार्गेट ( 15 लाख / 12 लाख) =1.25 बिस्कीट.
8. मित्राचे आयुष्याचे टार्गेट= (1.25 x 41 वर्षे) =51 बिस्कीट.
आता ही 51 बिस्कीट कमविण्यासाठी मित्राने आयुष्यभर काम करावे का? तर निश्चितच नाही, आपण आपली सेवानिवृत्ती ( रिटायरमेंट ) वेळेच्या आधी पण ठरवू शकता, जसे की,
9. मित्र वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत काम करणार.
10. मित्राचे नवे टार्गेट ( कामाचे ) = 65 - 40 ) = 25 वर्षे.
11. मित्राचे वार्षिक उत्पन्नाचे नवे टार्गेट =( 51बिस्कीट /25वर्षे )= 2 बिस्कीट प्रतिवर्ष.
12. म्हणजेच मित्राचे वार्षिक टार्गेट ( रुपयात ) = 2 x 15 लाख = 30 लाख रुपये.
13. त्यासाठी मित्राचे प्रतिदिन उत्पन्न = (30 लाख / 365 दिवस ) = 8220 रुपये.
14. समाजा मित्राचे आजचे प्रतिदिन उत्पन्न = 2000 रुपये आहे.
आता हा ( 2000 ते 8220 रु ) फरक खूपच मोठा आहे, पण मित्र त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो पण पुढील 5 वर्षात पूर्ण करू शकतो.
वरील मांडलेले गणित आपणास समजले असेलच, मग आपल्या मनात हा प्रश्न निर्माण होईल की सर्व कमाई ही सोन्यात बचत केल्यावर...... खायचे काय? बरोबर ना?
मित्रांनो जशी दारूची सवय एक पेग पासून.... एक खंब्यापर्यंत जाऊ शकते तर मग एखाद्या चांगल्या गोष्टीची सवय पण का नाही लागू शकत?..... ठरवले तर सर्व काही शक्य आहे.
आता आपण उत्पन्नाच्या 10% बचतीपासून बरेच पुढे जाऊ शकता हे आपणास खाली नमूद केलेल्या उदाहरणावरून नक्कीच कळेल.
1. मित्राने ठरविलेले आयुष्याचे टार्गेट = (12 लाख x 41 वर्षे) = 4.92 कोटी.
2. सोने बिस्कीट टार्गेट ( आजचे भावनुसार ) = (51 बिस्कीट x 15 लाख ) = 7.65 कोटी.
3. आज( 2026 + 41 वर्षे ) = सन 2067 ला मित्राकडे (51 बिस्कीट x 2कोटी *) = 102 कोटी असेल.
(* 2 कोटी ही किंमत मागील 100 वर्षाच्या आकडेवारी नुसार)
वर्ष ----- 10 तोळे ( 100 ग्रॅम ) किंमत
सन 1925 -- 180 रु.
1950 --- 990 रु
1975 -- 5550 रु
2000 ---44000 रु
2025 --15 लाख रु
2050 -- 75 लाख रु.
*2067 ---2 कोटी रु*
2075 --3.5 कोटी रु.
मित्राने ठरविलेले 4.92 कोटीचे टार्गेट हे पैशा ऐवजी सोन्यात बचत केल्याने ते 102 कोटीला पोहोचले.
मग आहे की नाही खरी गंम्मत सोन्यात पैसे गुंतविण्याची....... चला तर मग लागा कामाला....... आज पासूनच सोन्यात बचत करा...
आनंद ओढेकर
9762886450.