मैत्रीच्या आठवणींची फुले
मैत्रीच्या आठवणींची फुले
मैत्रीच्या आठवणींची फुले
माझ्या ओंजळीत आहे आजही
गंध त्यातील आनंदाचा
तसाच दरवळत आहे आजही
मैत्री अशी जी बालपणी उमलते
सूर्यप्रकाशापासून ती सावली वाटते
दुःख सारे "मैत्र" भेटीत वाहून जाते
मग मनीच्या सा्या व्यथांनाही हसू येते
जीवनातील रस्त्यावरचे दाट धुके
मित्रप्रेमा पुढे 'मीपण' झुके
मैत्रीविना सारेच रंग फिके
आनंदी क्षण बनतात हलके-फुलके
म्हणूनच या मैत्रीला फुलवायचे
फुलासारखे सर्वांनी जोपासायचे
मैत्रीच्या या बहरलेल्या मधुबनात
सर्वांचे जीवन सुगंधी करायचे
-कवी "देवदत्त"